Posts

श्यामची आईहे पुस्तक भाग 1

Image
श्यामची आईहे पुस्तक सुंदर आणि सुरस असून , त्यात साने गुरूजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे . मातेबद्दल असणाच्या प्रेम , भक्ति व कृतज्ञता अशा अपार भावना । ' श्यामची आई ' या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत . हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल . हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे . नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा लिहिण्यास ९ फेब्रुवारी १९३३ ( गुरुवार ) रोजी सुरुवात केली आणि १३ फेब्रुवारी १९३३ ( सोमवार ) पहाटे त्या लिहून संपविल्या . मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यवर्ती सूत्र आहे . त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या , सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे . पुष्कळ वेळा मनष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो . त्याचे पढचे बरे - वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते . त्याच्या ब - यावाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो . पाळण्यात असतानाच , आईच्या खांद्यावर खेळत असतानाच , पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते . मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे , असा मी करीत नाही . हिमालयाच्या